आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुक:कलदेव निंबाळामध्ये राष्ट्रवादीचा सरपंच व सदस्य

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या कलदेव निंबाळा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा तथा माजी सरपंच सौ सुनिता देविदास पावशेरे यांच्या आदर्श गाव परिवर्तन पॅनेलने नऊ पैकी आठ सदस्य जागा जिंकून निर्विवाद बाजी मारली. सरपंचपदी महादेव कांबळे हे ८७५ मताधिक्यानी य निवडून आले आहेत.

कलदेव निंबाळा ग्रामपंचायत निवडणूकीत सुनिता पावशेरे यांचे आदर्श गाव परिवर्तन पॅनल आणि बाळासाहेब स्वामी यांच्या श्री कल्लेश्वर ग्राम विकास या दोन पॅनल दुरंगी लढत झाली. सुनिता पावशेरे यांनी र महादेव कांबळे या युवकास सरपंच पदासाठी संधी दिल्याने नागरिकांनीही त्यांना निवडून दिले. विरोधी श्री कल्लेश्वर ग्राम विकास पॅनलचे डॉ. विद्याधर सूर्यवंशी यांचा ८७५ मतांनी पराभव केला. विजयी उमेदवार सरपंच महादेव कांबळे,सदस्य सुनिता पावशेरे, पूजा कांबळे, मिरा पाटील, राजोत्तम गायकवाड, गुरुलिंग बोकडे, पल्लवी डोणगावे, सुरेश बलसुरे, रुक्‍मीनबाई भंडे. आदींनी विजय संपादन केले.

पॅनल प्रमुख आदर्श सरपंच पावशेरे,लोकनियुक्त सरपंच महादेव कांबळे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.या निवडणूकीत चेअरमन तुकाराम बिराजदार यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली.निकालानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष संजय पवार, विधान सभा अध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह सर्वांनी मिरवणुकीनंतर सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...