आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयी:काक्रंब्यात बळीराजा पॅनेलचे सरपंच खताळ विजयी

काक्रंबा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काक्रंबा ग्रामपंचायतीच्या १३ जागासाठी पार पडलेल्या ग्रा.पं.अटीतटीच्या व बहुरंगी लढतीत काँग्रेस पुरस्कृत बळीराजा ग्रामविकास पॅनेलचे सरपंच कालिदास खताळ यांनी दणदणीत विजय मिळविला. काक्रंबा काँग्रेसचे गटाचे माजी जि.प. सदस्य बालाजी बंडगर यांनी सुरवातीपासूनच जोर लावल्याने काक्रंबा ग्रामपंचायतवर काँग्रेसला सत्ता राखण्यात बंडगर यांना यश मिळाले. उलट भाजपला खिंडार पडले आहे.

विजयी उमेदवार
विकास भिसे, निर्मला सुरवसे,सुजीत घोगरे,पवन वाघमारे, अनिता मस्के,शितल चंदनशिवे, नागनाथ खताळ, निशिगंधा पाटील,छाया वटे,प्रदिप घोगरे, सविता बंडगर,सदाम मुलाणी, वर्षा बंडगर हे उमेदवार विजयी झाले असून माजी सरपंच वर्षा बंडगर यांनी वार्ड क्र‌.एक व पाच या दोन ठिकाणाहून निवडणूक लढवली. मात्र वार्ड क्र‌.एक मध्ये त्यांचा पराभव झाला तर वार्ड क्र‌. पाच मधून त्या निवडून आल्या आहेत. त्यांचे पती सरपंच पदासाठी पराभूत झाले आहेत.

सर्वांना समान दिला कौल
मतदारांनी सर्वच पॅनल्सना समान कौल दिला आहे. बालाजी बंडगर यांच्या गटाला सरपंच व तीन सदस्य महाविकास आघाडीचे तरुण सरपंच पदाचे पॅनल प्रमुख अशोक दवगुंडे यांचे पाच सदस्य निवडून आले तर ॲड.नागनाथ कानडे यांच्या गटाचे चार सदस्य मतदारांनी निवडून देत सर्वांना समान कौल दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...