आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:ग्रामपंचायतीत सरपंचपद एसटी महिलेस आरक्षित; प्रभागात महिला आरक्षण नसल्याने सोडतीत तणाव

तेर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद हे एसटी महिलेसाठी आरक्षित आहेत. मात्र, प्रभाग आरक्षण सोडतीत एसटी महिलेसाठी एकही प्रभाग आरक्षित नसल्याने आरक्षण सोडतीवेळी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी अधिकाऱ्यांनी केलेल्या अरेरावीमुळे गावातील सभेत एकच गोंधळ उडाला. अधिकारी व ग्रामस्थांमध्ये सुरु असलेल्या बाचाबाचीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे ग्रामस्थांनी थेट उस्मानाबाद-लातूर राज्य मार्ग रोखून धरला होता. वाढत असलेल्या तणावामुळे शीघ्र कृती दलास पाचारण करावे लागले होते.

तेर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ६ जून २०२२ रोजी महसूल मंडळ अधिकारी अनिल तीर्थंकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग आरक्षण सोडत निघाली होती. परंतु त्यामधील काही प्रभागातील जागांवर रविराज बाळासाहेब चौगुले यांनी आक्षेप घेतला होता. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तो आक्षेप मान्य केल्याने २० जून २०२२ रोजी आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आला.

आरक्षण सोडतीची क्षणचित्रे
प्रभाग आरक्षण सोडतीसाठी दुसऱ्यांदा आरक्षण सोडत निघाली.
सकाळी दहा वाजेपासून ग्रामस्थ ग्रामसभेत बसून होते. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वांनी येथे ठिय्या दिला.
ग्रामसभेचे प्राधिकृत अधिकारी उदयसिंह चौरे यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालत अरेरावीची भाषा केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. यामुळे पारधी समाज व ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शीघ्र कृती दलास पाचारण करण्यात आले. दलाच्या दोन व्हॅन दाखल. तेरच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिस बंदोबस्तात आरक्षण सोडत काढण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली.
संतप्त जमावाने काही काळ उस्मानाबाद-लातूर राज्य मार्ग रोखून धरला. यामुळे वाहनांचा रांगा लागल्या होत्या.

प्रश्न - एसटी महिलेसाठी सरपंचपद आरक्षित असताना एकही प्रभाग राखीव नसल्यास सरपंच कोण?
उत्तर - जर एसटी महिला निवडून आली नाही तर एसटी पुरुषाचा तेथे विचार प्राधान्याने होऊ शकतो.
प्रश्न - पण त्या गावात एसटी सर्वसाधारण प्रभाग आरक्षित आहे. अशावेळी चित्र काय असेल ?
उत्तर - गावात एसटी सर्वसाधारण प्रभाग आरक्षित असल्यास तेथून महिला निवडून आल्यास त्या महिलेला ते पद मिळू शकते.
प्रश्न- दुसऱ्या प्रभागातून आरक्षित महिला निवडून आल्यास काय होऊ शकते?
उत्तर - ज्या आरक्षणासाठी पद आरक्षित आहे, आणि ती महिला कोणत्याही प्रभागातून निवडून आली असेल, व त्यांचे कास्ट व व्हॅलिडीटी पूर्ण असेल तर ती महिला त्या पदास पात्र ठरते. त्यात अडचण नाही.

बातम्या आणखी आहेत...