आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:अंदोरा ग्रामपंचायतीच्या‎ सरपंचपदी बळवंत‎ तांबारे‎

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंदोरा ग्रामपंचायतीच्या‎ सरपंचपदी बळवंत तांबारे तर‎ मंगळवारी (दि.३) उपसरपंचपदी‎ दत्तात्रय तांबारे यांची निवड‎ करण्यात आली आहे. कळंब‎ तालुक्यातील अंदोरा येथील‎ ग्रामपंचायत शिवसेनेचा पॅनल‎ श्रीदत्त कृष्णाई ग्रामविकास पॅनल तर‎ भाजपाचा जय हनुमान ग्रामविकास‎ पॅनल यांच्यामध्ये सरळ लढत झाली‎ आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती‎ बँकेचे संचालक बळवंत तांबारे व‎ भाजपाचे पी. जी. तांबारे हे सरपंच‎ पदासाठी समोरासमोर उभा होते.‎

यामध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता‎ आली असून सरपंचासह दहा‎ सदस्य निवडून आले आहेत. ३‎ जानेवारी २०२३ रोजी अंदोरा येथील‎ ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व‎ उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली‎ आहे. यामध्ये सरपंच पदी बळवंत‎ तांबारे आले हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...