आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दिनांक २ व ३ डिसेंबर या कालावधीत श्री तुळजाभवानी स्टेडियम व छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत २१ सुवर्ण, ९ रजत व ८ कांस्य अशी एकूण ३८ पदके जिंकून सलग २० व्या वर्षी क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिप पटकावून विक्रम स्थापित केला. प्रशालेतील दिव्यांग खेळाडूंनी आपल्यातील शारीरिक कमतरतेवर मात करीत यश संपादित केले आहे.
या स्पर्धेचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी पी.पी.शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी केंद्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे व जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेत प्रशालेतील दिव्यांग कलाकार विद्यार्थ्यांनी ताराराणी यांच्या पराक्रमावर आधारीत ऐतिहासिक नृत्य सादर केले. या नृत्यामध्ये ताराराणी यांच्या भूमिकेत कु. अदिती गायकवाड ही विद्यार्थीनी होती. तर संताजी,धनाजीच्या भूमिकेत अलीम चौधरी व सिद्धेश्वर मनाळे या दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. संध्याराणी कदम, अभिषेक धानूरे, सुर्या शिंदे,भाग्यश्री कांबळे,भाग्येश इस्लामपूरे,किरण खराते,विश्वजीत बिराजदार, महेश पवार,साक्षी नाईक यांनी मावळ्यांच्या भूमिकेत तर प्रशांत कांबळे याने मुघल सरदाराच्या भूमिकेत नृत्यात सहभाग घेतला.
क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडू अस्थिव्यंग ‘अ’- ८ ते १२ वयोगट मुले- प्रणव अडसूळ -५० मीटर व १०० मीटर धावणे- सुवर्णपदक, अदिती गायकवाड-५० मीटर व १०० मीटर धावणे-सुवर्णपदक, वयोगट-१३ ते १६- भाग्येश इस्लामपूरे-१०० मीटर धावणे-सुवर्णपदक, साक्षी नाईक ५० मीटर व १०० मीटर धावणे-सुवर्णपदक, वयोगट १७ ते २१- रोहित वाघमारे -१०० मीटर धावणे-सुवर्णपदक, मुस्कान बागवान -१०० मीटर व २०० मीटर धावणे- सुवर्णपदक
राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणार जिल्हास्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू आगामी महिन्यात दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रशालेतील सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, वै.सा.का.भारत कांबळे, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव निर्मलाताई बदामे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण वाघमोडे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.