आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:अणदूर येथील जवाहर विद्यालयामध्ये‎ सावित्रीबाई फुले जयंती साजरी‎

अणदूर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जवाहर विद्यालयात‎ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ‎जयंती साजरी करण्यात‎ आली.सकाळी परिपाठानंतर शाळा ‎व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष‎ रामचंद्र आलुरे तसेच गुंडेशा गोवे, ‎उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी‎ यांनी प्रतिमापूजन केले.‎ यावेळी कु.आर्या आलुरे, वैभवी‎ घोडके,अनुष्का घोडके,यशश्री‎ कोळेकर, संस्कृती घोडके,भक्ती‎ कबाडे,श्रध्दा सावंत,देवकी‎ घोडके,केतकी संगशेट्टी,श्रृती‎ कदम,प्रतिक्षा कबाडे, आसावरी‎ जाधव,आर्या बिराजदार,लक्ष्मी‎ पाटील, स्वराली पवार, कैवल्य‎ चव्हाण,शर्वील कोप्पा यांनी‎ आपल्या भावना व्यक्त केल्या.‎

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा‎ गौरव केला. स्वातंत्र्य सेनानी‎ कै.भानुदास धुरगुडे यांच्या‎ जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या‎ वक्तृत्व,सामान्यज्ञा न स्पर्धेत यशवंत‎ विद्यार्थी कु.आसावरी जाधव,तनुजा‎ पाटील,अंजली घुगे यांचा‎ मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात‎ आला.

यावेळी लिंबाजी सुरवसे सर,‎ उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी‎ यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई‎ फुले यांनी मुलींसाठी काढलेली‎ ‎शाळा, अज्ञानाचा अंधकार‎ घालविण्यासाठी केलेले‎ प्रयत्न,शिक्षण मुलींना मिळालेच‎ पाहिजे,अंधश्रद्धा निर्मूलन,सतीची‎ चाल, बालविवाह,केशवपन,आदर्‎ श शिक्षिका म्हणून केलेले प्रभावी‎ कार्य, सामाजिक परिवर्तनासाठी‎ केलेले प्रयत्न आदी बाबीवर प्रकाश‎ टाकला.यावेळी शिक्षक कैलास‎ बोंगरगे, गुलाब सय्यद तसेच सर्व‎ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व‎ विद्यार्थी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...