आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती‎:बावची विद्यालयात‎ सावित्रीबाई फुले जयंती‎

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बावची‎ विद्यालय,राजे शिवाजी पब्लिक‎ स्कूल, वसंतराव शंकरराव काळे‎ कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त‎ विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई‎ फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात‎ साजरी करण्यात आली.‎ कार्यक्रमासाठी राखीताई देशमुख‎ यशश्वीनी सामाजिक अभियान‎ तालुका समन्वयक राखी देशमुख,‎ डॉ.रमा मोरे,‎ प्रा.प्रविना मोरवे, मुख्याध्यापिका‎ अनिता रोडगे, मनिषा बनसोडे‎ आदीची उपस्थित होती.

यावेळी‎ बोलताना प्रा. मोरावे यांनी‎ इतिहासाचे दाखले देत विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन केले.डॉ.रमा मोरे यांनी‎ सकस आहार, स्ट्रेस मॅनेजमेंट,‎ मुलींच्या समस्या, व्यायामाचे‎ महत्त्व, इत्यादी सर्व विषयावर‎ सखोल मार्गदर्शन केले. राखी‎ देशमुख यांनी महिला सशक्तीकरण‎ याविषयावर मार्गदर्शन‎ केले.पालकांच्या वतीने सिमा‎ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.‎ या प्रसंगी विद्यालयातील अनेक‎ विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त‎ केली.

बातम्या आणखी आहेत...