आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गणपती बाप्पाला पुनरागमनायच म्हणत द्या निरोप; विसर्जनासाठी 12 तासांचा मुहूर्त

उस्मानाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांच्या मुक्कामानंतर शुक्रवारी (दि.९) लाडक्या गणपती बाप्पाला प्राण प्रतिष्ठेतून मुक्त करावे लागणार आहे. सकाळी ६.२७ मिनिटांपासून ते सायंकाळी ६.०७ मिनिटांपर्यंत विसर्जन अथवा मूर्ती हलवता येणार आहे. यंदा विसर्जनासाठी तब्बल १२ तासांचा मुहूर्त मिळाला आहे. बाप्पाची मुर्ती हलवण्यापूर्वी आरती करुन मोदकाच्या प्रसादानंतर चुरमुरे (मुरमुरे) अर्पण करुन मूर्तीचे विसर्जन करावे. तसेच विसर्जन करताना गणपती बाप्पा पुनरागमनाचय म्हणतच गणरायाला निरोप देण्याचे ज्योतिष तथा वास्तुशास्त्र तज्ञ उमेश जोशी यांनी दिव्य मराठीच्या वाचकांना सांगितले. गणेश चतुर्थीला आगमनानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पांचे विसर्जन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहेत. त्यानुसार विसर्जन करण्यासाठी भक्तांकडे मोठ्या प्रमाणात वेळ असणार आहे. ज्यांना ६.०७ मिनिटांपर्यंत बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणे शक्य नाही, त्यांनी किमान या वेळेपर्यंत मुर्ती हलवून घ्यावी. विधिवत केलेल्या प्रतिष्ठापनेनंतर आरती करुन आहे त्या जागेवरून मूर्ती हलवली तरी, मूर्तीचे एक प्रकारे विसर्जन असल्याचेच ज्याेतिषांनी स्पष्ट केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरगुती आणि सार्वजनीक मंडळाच्या मूर्तीचे याच वेळेत विसर्जन करण्याची योग्य वेळ आहे. सायंकाळी ६.८ वाजेपासून पौर्णिमा प्रारंभ होऊन पितृ पंधरवड्यात प्रारंभ होणार आहे. किंवा त्या वेळेपूर्वी हलवण्यात आलेल्या मूर्तीला विलंबाने ही विसर्जित करु शकतात.

असे करावे विसर्जन
जलाशय अथवा स्वच्छ वाहत्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन करावे. घरगुती मातीच्या मूर्तीचे मोठे पातेले, बकेट, ड्रम अथवा समांतर वस्तुंमध्ये विसर्जन करता येईल. हे करतांना गणपतीची आरती करुन चुरमुरे, गुलाल वाहून पाणी हाताला स्पर्श करत असल्यास तीन वेळा मुर्ती पाण्यात बुडवून चौथ्या वेळी तिचे विसर्जन करावे. तसेच प्रत्येक वेळी गणपती बाप्पा पुर्नआगमण म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचा जय घोष करावा. एका हाताने मुर्ती विसर्जन करु नये. दोन्ही हाताने मुर्ती सोडावी.

विधिवत पूजन करुन द्यावा निरोप
बाप्पांच्या आगमनही विधिवत करुन त्या मूर्तीत आपला प्राण ओतून आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतो. त्यामुळे निरोप देतानाही त्याच मनोभावे विधिवत पूजन, नैवेद्य दाखवून आरती करत देवाला निरोप द्यायचा असतो. आपल्या प्राणाची जशी काळजी घेतो, तशीच काळजी घेऊन विसर्जन शांततेत पार पडणे आवश्यक आहे.

कार्य पूर्ण केल्याचे प्रतीक सत्यनारायण
दहा दिवस आपण बाप्पाची मनोभावे सेवा करुन ते कार्य पूर्ण झाले म्हणून सत्यनारायण पूजा करत असतात. आपल्या सोयीनुसार गौरी- महालक्ष्मी विसर्जनानंतर केंव्हाही सत्यनारायण करु शकता. तसेच आपल्या प्राण देऊन स्थापन केलेल्या मूर्तीची हेळसांड न करता दोन्ही हातानी विसर्जन करावे. यंदा खूप वेळ असणार आहे.
उमेश जोशी, ज्योतिष तथा वास्तुशास्त्र तज्ञ, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...