आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळेवर वेतन नाही:वेतनासाठी सफाई कामगारांचा ठिय्या

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सफाई कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही तसेच ठेकेदाराकडून नियमित व वाढीव वेतन देण्याच्या मागणीसाठी रविवारी (दि. १) सफाई कामगारांनी उमरगा येथे महात्मा बसवेश्वर मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केले.

निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषद प्रशासनाकडून शहर स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केला जातो. उपलब्ध कामगारांवरच स्वच्छतेचे कामे आटोपली जातात. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेकेदाराकडून काळजी घेतली जात नाही.

दोन महिन्यांपासून वेतन थांबले आहे. यामुळे कामगारानी महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पतगे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन केले. यामध्ये सिद्धार्थ सूर्यवंशी, गौरव सरपे, महेश कांबळे, बाळू शिंदे, श्रीधर भोसले, रेखा भाले, मंगल भालेराव, शोभा कांबळे, जनाबाई गायकवाड, रूक्मिण क्षीरसागर हे कामगार उपस्थित होते. न्याय न दिल्यास बेमुदत काम बंदचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...