आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने शिष्यवृती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृती परीक्षेत शिष्यवृती धारक झालेल्या विद्यार्थ्यांचा कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. शिक्षक भवन कळंब येथे डाॅ.संजीवनी जाधवर -लाटे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा अनुराधा देवळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष देशपांडे , महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस जेमिनी भिंगारे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय पवार व जिल्हा प्रवक्ते उमेश भोसले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका उर्मिला भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डाॅ. जाधवर -लाटे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी परिश्रम करणे गरजेचे आहे, पुढील जीवनात आपणास अनेक स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे त्याची तयारी आता पासूनच करावी लागेल. शिक्षणाबरोबर संस्काराकडेही पालकांनी लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भागवत जाधवर, संचालक गणेश कोठावळे, भूषण नानजकर, तालुका संघाचे कार्याध्यक्ष प्रशांत घुटे, हनुमंत घावटे, मनिषा ताकपिरे, विजयश्री भालेकर,संगिता अनपट उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय सुरेवाड दिपक चाळक,सुनिल बोरकर,अशोक डिकले, रामचंद्र पवार, कालिंदा मुंढे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्तावित वैशाली क्षिरसागर तर सुत्रसंचलन व आभार ज्योती ढेपे यांनी मानले.
इयत्ता ८ वी चे कृष्णा गायकवाड ,सोहम पुरी,मंथन निरफळ,तन्मय वाघमारे,तेजस काळे,आदर्श बाभळे,वेदांत जाधवर, तर इयत्ता ५ वीच्या साईराज भिसे,वसुंधरा नांगरे,ऋषिकेश क्षिरसागर ,श्रीयश गिलबिले,तनिष्का माने,स्वराज तांबारे,तनिष्का मगर,मृनाल पवळ,प्रांजल देशमुख ,गार्गी जाधव, विनय शिंदे,वेदांत शिंदे,क्षितिजा वनवे,आरुषी गोरे, सायली गायकवाड,नक्षत्रा जावळे,राज अनपट, वेदांत भोरे,तन्मय कदम यांचा एक हजार रुपये रोख,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गेल्या पंचवार्षिक मध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले, शिवराज मेनकुदळे,दशरथ मुंढे,तोफीक मुल्ला, सतिश येडके,धनंजय अनपट, नागेश टोणगे, अविनाश पवार, चंद्रकांत शिंदे व पांडुरंग वाघ यांचा ही उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.