आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:अंतरगावात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य‎

गणेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील अंतरगाव येथील सामाजीक‎ कार्यकर्त्या जनाबाई बाबासाहेब गोरे व उद्योजक‎ बाबासाहेब गोरे यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना‎ शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले.‎ सकाळी अकरा वाजता स्वतःच्या‎ वाढदिवसाचा खर्च टाळून जिल्हा परिषद‎ प्राथमिक शाळा अंतरगाव व तुकाई नगर येथील‎ शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व ११०‎ विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य दप्तर, वही, पेन‎ यासह खाऊचे वाटप केले.

गावचे सरपंच‎ दीपक माळी व उपसरपंच संतोष श गोरे याच्या‎ हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तुकाई नगर‎ शाळेचे मुख्याध्यापक वैजिनाथ नरके व जिल्हा‎ परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुलकर्णी‎ यांनी जनाबाई गोरे व बाबासाहेब गोरे यांचा फेटा‎ व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार‎ करण्यात आला. यावेळी वैजिनाथ नरके,‎ ग्रामसेवक दीपक व्होळकर, बालाजी गुंजाळ,‎ मेहमूद बागवान, वर्षा अंधारे, बिरमल माळी,‎ गणेश लोद, अनंता खैरे, संभाजी इजगज,‎ ज्ञानोबा गोरे, राजेंद्र यादव, ग्रामस्थ उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...