आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

उस्मानाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. आदर्श महिला पतसंस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

संस्थेचे अध्यक्ष त्रिंबक कपाळे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष एच. व्ही. भुसारे यांनी संस्था गरीब विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असून या विद्यार्थ्यांनी काही अडचणी असल्यास संस्थेशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी परिश्रम करुन आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष त्रिंबक कपाळे, उपाध्यक्ष एच. व्ही. भुसारे, सचिव प्रकाश स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. या वेळी वैष्णवी बालाजी क्षीरसागर, श्रावणी रामकृष्ण क्षीरसागर, अनुष्का सुभाष ठोंबरे, अलमास करीम पठाण, मयुर रामेश्वर मस्के, इश्वरी तुकाराम शिंदे, रोहन गोपाळ साखरे आदी विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. संस्थेच्या सदस्या सविता विभुते, अर्चना पाटील, पतंगे आदी उपस्थित होते. प्रकाश स्वामी यांनी आभार मानले.