आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगौरव:विद्यालायचा निकाल 99.34 टक्के; बावची विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव

परंडा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बावची विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.२१) झाला. कार्यक्रमासाठी गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी मंगेश देवकर, डॉ.इम्रान पल्ला, प्रा. विजय जाधव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे, मुख्याध्यापिका अनिता रोडगे आदी उपस्थित होते प्रास्ताविक करताना नारायण खैरे यांनी सांगितले की,माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ऑनलाईन जाहिर झाला यामध्ये विद्यालायचा निकाल ९९.३४ टक्के लागला आहे.

यामध्ये विद्यालयातून १५३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते.पैकी ९९ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, तर प्रथम श्रेणीत ४३ विद्यार्थी ,द्वितीय श्रेणीत १० विद्यार्थी उतीर्ण झाले. परंडा तालुक्यात प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावला आहे बावची विद्यालय, परंडा शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सांगितले. गुणवंतांपैकी गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ४ विद्यार्थी होते.लॉक डाऊन मध्ये सुद्धा ऑन लाईन तास घेतल्यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगितले.मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्कॉलरशिप मध्ये एकूण ३८ विद्यार्थ्यां पैकी १५ विद्यार्थी पात्र तर ४ विद्यार्थी धारक झाले आहेत.एनएमएमएस मध्ये एकूण २८ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी पात्र तर ५ विद्यार्थी धारक झाल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वाघमारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...