आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार साहित्य चोरी केल्याचा प्रकार:नगरपरिषदेचा कर्मचारी भंगार व्यावसायिकाने चोरले भंगार; सीसीटीव्ही कॅमेरे बघून ८ दिवसात अहवाल तयार करण्याचे आदेश

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेच्या आवारातून नगरपरिषदेचा कर्मचारी आणि शहरातील भंगार साहित्याचा व्यावसायीक यांनी मिळून सुटीच्या दिवशी भंगार साहित्य चोरी केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी चौकशी करुन आठ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण यलगट्टे यांनी उपमुख्याधिकारी यांना दिला. चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीही गठीत करण्यात आली.

नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य नगर परिषद कार्यालयात आणले होते. त्या साहित्याची विल्हेवाट परस्पर लावण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हे साहित्य २३ व २४ जुलै रोजी असलेल्या सार्वजनीक सुटीच्या दिवशी चोरून नेल्याचा प्रकार घडला. भर दिवसा हा प्रकार घडला.

बातम्या आणखी आहेत...