आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया:वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा नोटीस

काक्रंबा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील एका महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल वाघमारे व डॉ. श्वेता जगताप यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केवळ नोटीसवर नोटीस देण्यापलीकडे कारवाई करण्यास विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

काक्रंबा येथील नागनाथ ढेरे यांनी सलगरा (दि.) प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलगी राधा अशोक शेंडगे हिची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल केले होते. त्यनंतर मुलीला त्रास होत असल्याने पिडीत मुलीच्या वडीलांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली असता शस्त्रक्रिया झाली नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा वडील ढेरे यांनी डाॅ. वाघमारे व जगताप यांच्याविरोधात तक्रार केली. डाॅक्टरवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून निलंबित करण्याची मागणी ढेरे यांनी केली. याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एस. एन. हालकुडे यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना १५ दिवसात नोटीसा काढून डॉक्टरांची चौकशी करून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष कुठलीही कारवाई न करता दोन वेळेस नोटीस देऊन वेळ मारून नेली जात आहे, अशी तक्रार ढेरे यांनी केली.

खुलासा पाठवू
सलगरा आरोग्य केंद्रातील डाॅक्टरच्या चौकशीचे पत्र प्राप्त झाले असून सबंधित डाॅक्टरला कळवले आहे. खुलासा प्राप्त होताच वरिष्ठाना पाठवून देण्यात येईल. डाॅ. नितीन गुंड, तालुका आरोग्य अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...