आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा:महाराष्ट्राचा सलग दुसरा विजय, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश संघांचा पराभव

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरज आणि रेश्मा राठाेडच्या कुशल नेतृत्वाखाली यजमान महाराष्ट्र संघांनी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली. यजमान संघांनी साेमवारी घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय साजरा केला. महाराष्ट्र पुरुष संघाने सामन्यात उत्तराखंडचा पराभव केला. तसेच महाराष्ट्र महिला संघाने लढतीत अरुणाचल प्रदेशवर डावाने विजय साजरा केला. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर १७-७ असा १:१० हि. राखून डावाने धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप व प्रतीक वाईकर (प्रत्येकी २:४० मि. संरक्षण व १ गुण), अक्षय मासाळ (२:१० मि‌. व ३ गुण), लक्ष्मण गवस (२:१० मि. संरक्षण व २ गुण), सूरज शिंदे (२:२० मि. संरक्षण) व गजानन शेंगाळ (३ गुण) यांनी महाराष्ट्राला डावाने विजय मिळवून दिला. प्रियंका, स्नेहलची सर्वाेत्तम खेळी : महाराष्ट्र महिला संघाने अरुणाचल प्रदेशचा १८-३ असा एक डाव ने मात केली. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (५ गुण), स्नेहल जाधव (नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), प्रतीक्षा बिराजदार (२:४० मि. संरक्षण), प्रीती काळे व श्रेया (प्रत्येकी २:१० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (४ गुण), दीपालीने (३ गुण) सरस खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...