आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींची आट्या पाट्या व रग्बी स्पर्धेमध्ये विभागीय स्तरासाठी निवड करण्यात आली आहे.कळंब तालुक्यातील हिंगणगाव येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेमध्ये विजय संपादन करून शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील मुले व मुलींच्या संघाने विभागीय स्पर्धेसाठी स्थान पक्के केले आहे. तसेच ८ डिसेंबर २०२२ रोजी हिंगणगाव येथे झालेल्या रग्बी या स्पर्धेमध्ये मुलींचा संघ सर्वप्रथम आला. या दमदार कामगिरीमुळे त्यांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रग्बी १९ वर्षे वयोगटातील स्पर्धेसाठी अक्षता मगर, भक्ती माळकर, गायत्री माळकर, अनुजा लोंढे, प्रतीक्षा माने, श्रुती कवडे, श्रेया मगर, प्रियंका भांडे, निकिता भांडे, गौरी मुर्गे, ज्ञानेश्वरी कापसे यांची निवड करण्यात आली आहे. मुलांच्या १९ वर्षे वयोगटामध्ये आट्या-पाट्या स्पर्धेसाठी तुषार डोंगरे, आर्यन मोरे, संकेत करवलकर, स्वप्निल माने, गोविंद हुंबे, शुभम घोगरे, सोम डोंगरे, श्रेयस क्षीरसागर, रितेश शिंदे, श्रीकृष्ण डोंगरे, शिवाजी शेळके, विक्रम डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, उप प्राचार्य पंडित पवार, डॉ. सतीश लोमटे, क्रीडा शिक्षिका प्रा. सरस्वती वायभसे, लक्ष्मण मोहिते, प्रा. नंदकिशोर टेकाळे, प्रा. अप्पासाहेब मिटकरी, अरविंद शिंदे आदींनी काैतुक केले. येथील ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात नियमित कसून सराव केला. विजय व चांगल्या कामगिरीच्या जिद्दीमुळे त्यांची यश खेचून आणले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.