आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी अपर्णा सूर्यवंशी हिची निवड

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नांदेड येथे घेण्यात आलेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी कु. अपर्णा शिवाजी सूर्यवंशी हिने १९ वर्ष वयोगट व ५५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.

राज्यस्तरीय स्पर्धा दि. ११ व १२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे होणार आहेत. अपर्णाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे व नागनाथ पांढरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्यानी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे व नागनाथ पांढरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. सुनिल बहिरे, प्रा. सचिन शिंदे, प्रा. बालाजी सूर्यवंशी, प्रा. राजेंद्र साळुंके, प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. रामचंद्र खुणे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...