आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

बार्शी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथे दि. ३ डिसेंबर पासून आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व्हॉलीबॉल मुलींचा संघ सहभागी होत आहे. यात संघनायकासह विद्यापीठाच्या संघात बार्शीचे सात खेळाडू आहेत.

सदर संघाचे सर्व शिबिर शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे दि. २२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये पार पडले. गायत्री मोहिते, मोनिका पाटील, मयुरी जगताप (शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी), वैष्णवी बानगुडे, आचल वर्पे, सोनाली गोडगे, सोनाली रामगुडे (शिवाजी महाविद्यालय बार्शी), मंजुषा उन्हाळे, सलोनी बनकर, मयुरी कोष्टी, वैष्णवी ताटे, सायली भवर, या खेळाडूंना शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरेश लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. बापू मोहित हेे संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...