आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:ओरियन स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुकास्तरीय योग व बुद्धिबळ स्पर्धेत शहरातील ओरियन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. यामुळे त्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षे वयोगटातून इयत्ता आठवीतील अतिक उस्ताद, सहावीतील यश राठोड, रेहान गुलफरोश यांनी यश मिळवले.

मुलींमधून १४ वर्षे वयोगटातून ओमेरा शेख हिने यश संपादन केले. त्यांना क्रीडा प्रशिक्षक अमोल भोसले, गोपाळ अंबोरे, सुधाकर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष प्रा. सुनीता चावला, कॉ. अरुणकुमार रेणके, संस्थेचे सचिव बलविंदर गादरी, मुख्याध्यापिका दीपाली पाटील यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...