आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:नरेंद्राचार्य महाराज तालुका सेवा समितीची निवड, संतोष केसकर यांचे मार्गदर्शन

उमरगा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवन धावपळीच्या काळात दिवसेंदिवस व्यस्त होत चालल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अन्न पदार्थातील रासायनिक घटकांचा आरोग्यावर परिणाम होत असून नागरिकांनी आध्यात्मिक सेवाभावातून आरोग्याबाबत सकारात्मक होऊन लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा समितीचे अध्यक्ष संतोष केसकर यांनी व्यक्त केले.

शहरात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज तालुका सेवा समितीची कार्यकारिणी निवडी संदर्भात रविवारी (दि.१२) आयोजित बैठकीत केसकर बोलत होते. प्रथम जगद्गुरु नरेद्राचार्य महाराज यांचे पूजन व आरती करत तालुका सेवा समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. तालुकाध्यक्षपदी राम विनायक पाटील, सचिवपदी सोपान श्रीमंत सूर्यवंशी यांची तर तालुका युवाध्यक्षपदी विकास नानासाहेब सूर्यवंशी यांची सर्वानुमते निवड झाली.

केसकर म्हणाले की, गरजूंना जीवनदान देण्यासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचार महत्वाचे आहेत. निरोगी जीवनबरोबरच पर्यावरणासाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. धावपळीच्या युगात अनेक आजारांचे प्रमाण वाढले असून ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. तपासणी करुन जीवनमान उंचावणे आवश्यक आहे. बैठकीस श्री जगद्गुरु नरेद्राचार्य महाराज सेवा समितीचे महिला, पुरुष सेवेकरी उपस्थित होते. नूतन युवा तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...