आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:बळीराजा शेतकरी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बळीराजा शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्याने त्यांची महिन्यापूर्वीच शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम लढा देणाऱ्या संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवडी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील (सातारा) यांनी जाहीर केल्या.

येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही बळीराजा शेतकरी संघटना २०१४ मध्ये पंढरपुरात विठ्ठलाच्या साक्षीने स्थापन केली.

ही संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून त्यांच्या अडीअडचणी सोडवत त्यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. वेळप्रसंगी जेलमध्ये गेलो. परंतु, परंडा तालुक्यात काही पदाधिकारी संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा तक्रारी आल्या. अशा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शेतकरी संघटनेला बदनाम करणाऱ्याला चाप बसावा यासाठी लवकरच पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आमचे पदाधिकारी कोण आहेत, कोण नाहीत याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हाध्यक्षपदी फारुख शेख, तालुकाध्यक्ष विजय मेहेर, तालुका युवाध्यक्ष अमित आगरकर, तालुका उपाध्यक्ष धनंजय गोफणे यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष बोरा, उत्तम खराडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील, आबासाहेब चौधरी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...