आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (पेठ) येथील खेळाडूंनी तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत दबदबा निर्माण केला आहे. या शालेतील नऊ खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी (दि.१६) तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (पेठ) विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. १४ वर्षे वयोगटातून मुलांमध्ये अर्जून काकासाहेब नारे हा लांब उडीमध्ये प्रथम आला. प्रतीक सम्रत हा ८० मीटर हर्डल्स स्पर्धेत द्वितीय आला. सार्थक रामगुडे हा उंडी उडीमध्ये द्वितीय आला.
करण देवकते हा उंच उडीमध्ये तृतीय आला. तर मुलींमध्ये पल्लवी माने हिने धावण्याच्या स्पर्धेत १०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी माने हिने थाळी फेकमध्ये द्वितीय, श्रावणी शहाजी टेळे हिने ८० मीटर हर्डल्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. श्रावणी शेळके हिने ८० मीटर हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. नंदिनी पाडूळे हिने उंच उडीमध्ये प्रथम, अक्षरा आष्टेकर हिने लांब उडीमध्ये प्रथम, गायत्री सावतर हिने उंच उडीमध्ये तृतीय, पल्लवी माने हिने लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे शाळेतील ९ खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, या यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे, सहशिक्षक गोरोबा पाडुळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी यशस्वी खेळाडूंचा मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक विक्रम खडके, गोरोबा पाडुळे, गणपती यरकळ, चंद्रकांत गिरी, शशिकांत देशमुख, गोरख चौरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.