आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण केंद्र:पारगावच्या प्रणव बहिरची  लातूर येथील विभागीय कुस्ती  स्पर्धेसाठी निवड

पारगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील पारगाव येथील महात्मा फुले विद्यालयाचा मल्ल प्रणव तात्यासाहेब बहीर याने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रिडा कार्यालय व उस्मानाबाद जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ यांच्या वतीने येथील तुळजाभवानी स्टेडियम वर नलावडे क्रीडा संकुल येथे गुरुवारी (ता १५) जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सतरा वर्षे वयोगटातून प्रणव बहीर याने ७१ किलो वजनी गटातून येडशीच्या समर्थ भोपळे याच्यावर मात करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला.

प्रणव, रुई येथील न्यू छत्रपती शाहू महाराज कुस्ती प्रशिक्षण केंद्रात एनआयएस कुस्ती कोच दत्ता मेटे यांच्यासह वस्ताद आनंदराव पाटील,तात्यासाहेब बहिर,बाळासाहेब सुबुगडे, उमेश महाडिक , मोहन सुबुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.या यशाबद्दल शुक्रवारी बहीर यांच्यासह जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवलेले महात्मा फुले विद्यालयाचे मल्ल किरण रामचंद्र आखाडे, अमर मोहन सुबुगडे व तेजस शिवाजी घाडगे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पारगावचे सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण,मुख्याध्यापक रमेश बडे, प्रा शिवाजी माने, सिध्देश्वर शहाणे, अरूण आखाडे,बाळासाहेब जाधव, पांडुरंग पाटील, विजय राठोड, राजेंद्र वंजारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...