आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी:निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत रुईच्या दोन मल्लांची निवड

पारगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील रूई येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज तालीम संघाचे मल्ल प्रणव तात्यासाहेब बहीर व दत्ता मेटे यांची जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत अनुक्रमे ६१ व ६५ किलो वजनी गटातून निवड झाली आहे.कंडारी ता. परांडा येथे दिनांक ४ व ५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी चाचणी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्हा भरातून अनेक मल्लांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत माती गटात खेळवण्यात आलेल्या ६१ किलो वजनी गटातून रूई येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज तालीम संघाचा मल्ल प्रणव तात्यासाहेब बहिर व गादी गटातून ६५ किलो वजनी गटात दत्ता मेटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे दोन्ही मल्ल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. या दोन्ही मल्लांना वस्ताद आनंदराव पाटील, तात्यासाहेब बहीर, मोहन सुबुगडे, उमेश महाडिक, बाळासाहेब सूबुगडे, मंगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे.यावेळी परिसरातील अनेक पैलवान उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...