आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:शिवशक्ती विद्यालयाच्या दोघांच्या विज्ञान प्रकल्पाची निवड

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या तिसाव्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये तालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयाच्या प्रियंका उबाळे व आकांक्षा बोंडगे यांचा" सोयाबीन पिकावरील गोगलगायींचा प्रादुर्भाव कारणे व उपाय" या प्रकल्पाची राज्यस्तरासाठी निवड झाली. हा विषय या भागातील शेतकऱ्यांसाठीची ज्वलंत समस्या होती. यात विद्यार्थ्यांनी या मागची कारणे व उपाय यावर संशोधन करून ती प्रकल्पात सादरीकरण केले.

यांच्या या यशाबद्दल व राज्य स्तर निवडीबद्दल ,ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे व संस्थेचे जेष्ठ संचालक नरसिंग करके यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.यावेळी विज्ञान शिक्षक अजित साळुंके यांनी मार्गदर्शन केले.या निवडीबद्दल पालकातून व गावातून आनंद व्यक्त होत आहे. यावेळी विद्यालयातील विजया गायकवाड ,धनराज पाटील, राजेंद्र सगर, सिद्धेश्वर वाकडे, महादेव करके, म्हाळप्पा कोकरे, सोमनाथ म्हेत्रे, दत्तू कांबळे, मोहन दुधंबे शिवाजी चेंडके आदी कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...