आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धांचे बुधवारी (दि.१४) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव प्रवीण गडदे उपस्थित होते. स्पर्धेतील अनेक विजयी खेळाडूंची नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत १२० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होती. १९ वर्ष वयोगटातील विविध वजन गटात मुलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत साई राठोड, आदर्श ताकपेरे, केतन खंडागळे, धनराज पवार यांनी सुवर्णपदक मिळविले.
देवेंद्र काळे, सूरज जाधव, सत्यजित गाजरे याने रजत पदक मिळवले. मुलींमध्ये प्रतीक्षा राठोड, शिवानी टिंगोले, हर्षदा चाकोरे, सुहानी घोडके, अस्मिता पाटील यानी सुवर्णपदक मिळविले. १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी झालेल्या स्पर्धेत विशाल भोसले, सम्यक वाघमारे, पंकज मुगळे, अजीमखाणे वैभव, सिद्धार्थ गायकवाड, सक्षम धबडे, प्रथमेश उप्पार या स्पर्धकांनी सुवर्णपदक मिळविले.
प्रणव भोसले, कृष्णा लंगडे, दत्तराज कोळी यांनी रजत पदक मिळविले. मुलींमध्ये लक्ष्मी होगाडे, सोनाली होगाडे, रोहिणी मेहेर, समृद्धी पवार, स्नेहल पालवे, पौर्णिमा खरमाटे यांनी सुवर्णपदक व मोहिनी मेहेर, गायत्री कुकुर्डे यांनी रजतपदक मिळविले. १४ वर्ष वयोगटात अग्नि बनसोडे, शिवशंकर बिराजदार, पृथ्वी चव्हाण यांनी सुवर्णपदक, युवराज पाटील याने रजतपदक. मुलींमध्ये किर्ती माने, वृंदा लंगडे, श्रावणी मुळगे, यशस्वी माने, संस्कृती धावणे सुवर्णपदक. प्राची भोसले, श्रावणी दामावले यांनी रजतपदक व चिन्मय महामुनी, अजिंक्यराजे पाटील रजतपदक मिळविले.
नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेसाठी जिल्हा ज्युदो संघटनेचे सहसचिव प्रताप राठोड, तालुका क्रीडा संयोजक संजय सोलंकर, मालाजी काळे, विजय पवार, सुनील बेलंबकर, गोविंद गायकवाड, मुनीर शेख, आष्टे, प्रशिक्षक कैलास लांडगे, पंच म्हणून कदम, बालाजी चव्हाण, एकुरगे, ओम राठोड आदींनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.