आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आदर्श विद्यालयात निवड चाचणी परीक्षा‎

उमरगा‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीहरी कोटा विज्ञान शैक्षणिक सहल‎ निवड चाचणी परीक्षा केंद्रीय शाळेतून‎ संपन झाल्या नंतर निवड झालेल्या‎ तालुक्यातील विद्यार्थ्यांची शहरातील‎ आदर्श विद्यालयात सोमवारी (दि१३)‎ तालुकास्तरीय निवड चाचणी परीक्षा‎ घेण्यात आली.‎ अंतरिक्ष विज्ञान शैक्षणिक सहल‎ निवड परीक्षेची माहिती देताना प्राचार्य‎ सोमशंकर महाजन म्हणाले की,‎ तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक‎ दृष्टीकोन रुजविण्यासाठी आणि‎ राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची‎ माहिती व्हावी यासाठी या निवड‎ चाचणी स्पर्धा परीक्षाद्वारे जिल्ह्यातील‎ प्रत्येक तालुक्यातून दहा विद्यार्थ्यांची‎ निवड केली जाते. निवड झालेल्या‎ विद्यार्थ्यांची पुढे जिल्हास्तरीय परीक्षा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घेत निवडक विद्यार्थ्यांना विभागीय‎ आयुक्त विभाग मार्फत विज्ञान‎ शैक्षणिक सहल म्हणून अंतरिक्ष केंद्र‎ श्रीहरी कोटा आंध्रप्रदेश,थुंबा स्पेस‎ म्युझियम, निरुअंनतपुरम केरळ‎ विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीयल, टेक्निकल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ म्युझियम बंगलोर आदी स्थळांपैकी‎ निवड करून श्रीहरी कोटा भेटीसाठी‎ निवडक विद्यार्थ्यांना शैक्षणिक विज्ञान‎ सहलीसाठी पाठवले जाणार आहे.‎

यात घेण्यात आलेल्या परीक्षेचे विषय‎ भौतिकशास्त्र, गणित,‎ अस्ट्रोफिजिक्स, बायोकेमिस्ट्री आणि‎ पर्यावरण या विषयावर प्रश्न विचारले‎ जातात.‎ गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना भोजन व‎ विमान प्रवासाच्या शासकीय‎ खर्चासह शैक्षणिक विज्ञान सहलीस‎ पाठवले जाते अशी माहिती दिली.‎ यावेळी केंद्र संचालक रमजान पठाण‎ यांनी परीक्षेचे सर्व कामकाज पाहिले.‎ केंद्रीय मुख्याध्यापक अब्दुल कादीर‎ कोकळगावे, धैर्यशील भोसले,‎ नागनाथ येवते, परमेश्वर साखरे,‎ प्रकाश मुळे यांनी पर्यवेक्षण केले. या‎ परीक्षा सुरळीत होण्यासाठी पर्यवेक्षक‎ बी. एम. पाटील,शिक्षक तात्याराव‎ फडताळे, राजेंद्र जाधव, परमेश्वर‎ भुजबळ, सुरेश शेंडगे आदींनी‎ पुढाकार घेतला. मुलांच्या गुणांना वाव‎ देणारा हा पहिलाच उपक्रम आहे.‎

बातम्या आणखी आहेत...