आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये स्वयंशासन दिन व विद्यार्थ्यांना निरोप

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात बुधवारी (१६) आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण अन निरोप समारंभ सोहळ्यात अध्यक्षीय समारोपाप्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना निरोप व वार्षिक काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापक म्हणून भाग्यश्री करके हिने काम पाहिले. यावेळी कु मनिषा मोरे हिने मनोगत व्यक्त केले. विजया गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहशिक्षक अजित साळुंके, धनराज पाटील,राजेंद्र सगर,सिद्धेश्वर वाकडे,महादेव करके, म्हाळप्पा कोकरे, सोमनाथ म्हेत्रे, मोहन दूधंबे, शिवाजीराव चेंडके यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अजित साळुंके यांनी सूत्रसंचलन केले. महादेव करके यांनी आभार मानले.

गणेगाव जि.प. शाळेत कार्यक्रम
भूम तालुक्यातील गणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील आठवीच्या विदयार्थ्याचा स्वयंशासन दिन उत्सहात साजरा करण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका म्हणून निकीता घनशाम गुंड व उपमुख्याध्यापक म्हणून प्रथ्वीराज सतीश पाटील यांनी दिवसभर काम पाहिले . आठवीच्या विद्यार्थ्यानी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्याना अध्यापन केले.यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विष्णू पवार व वर्ग शिक्षक संतोष तोडकरी, दत्तात्रय गुताळ, मणिष खैरे, अनिल दुधाळ, संगीता शिंदे, विद्या वैद्य, आदी उपस्थित होते. या आठवीच्या विद्यार्थ्याना संगीता शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

दस्तापूर जि.प.शाळा
दस्तापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक म्हणून रोहन डोंगरे तर पर्यवेक्षक अनिकेत वाकळे यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमानंतर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश डोंगरे व शिक्षणतज्ञ प्रभाकर मदने यांच्या हस्ते ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या प्रोजेक्टरचे उद्घाटन करण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षातील मुला-मुलींना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शालेय व्यवस्थापन समितीकडून शाळेला भेट देण्यात आली. खाऊ शिजवणारे उर्मिला एकिले, विठ्ठल एकिले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष रत्नय्या स्वामी, उपसरपंच सोमनाथ पाटील, सिद्धया स्वामी, संभाजी चव्हाण, महानंदा पाटील, पार्वती झुंजारे, जगन वाकळे उपस्थित होते.

दाळिंब जि.प. शाळा
उमरगा तालुक्यातील दाळींब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाचा अनुभव यावा,त्याच्यात नेतृत्व करण्याचे गुण विकसित व्हावे म्हणून स्वंयशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापक म्हणून कु.श्वेता जाधव उपमुख्याध्यापक फरहान मिरासय, पर्यवेक्षक कु.मधुरा गुंड यांनी काम पाहिले तसेच इतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांची,शिपाई पदाची भुमिका बजावली. या कार्यक्रमाचे नियोजन गवळी सर,श्रीमती बिरादार, खैराटे,फुरडे या शिक्षकांच्या मार्गदर्शानाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी दिवसभरातील अनुभव आपल्या भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक राठोड, साळुंखे, सुरवसे,चव्हाण, सांगळे, कवठे, भुसार,माधकरे,श्रिमती येचे,सगर,ढेरे,कुलकर्णी, पोतदार आदी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...