आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक विकास:कळंबमध्ये 19 सप्टेंबरला महामोर्चा ; मराठा समाजाला आरक्षणाची मागणी, एसडीओंना निवेदन

कळंब3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी कळंब शहरात १९ सप्टेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात करण्यात येणार आहे. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निनेदनात म्हटले आहे की, मराठा कुणबी, लेवा मराठा, कुणबी मराठा, लेवा पाटील, मराठा हे सर्व एकच असून, मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा तरुणांच्या उद्योगासाठी स्थापन झालेले आहे. त्याची कर्ज मर्यादा व्याज परताव्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी मंजुरी द्यावी. तसेच यासाठी निधीची तरतूद करावी. तसेच आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू करावी. या प्रमुख मागण्या तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाचे विशेष लक्ष वेधण्यासाठी दिनांक १९ सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने महामोर्चा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांना निवेदन देण्यात आले.

विद्यार्थी वसतिगृह उभारा
मराठा समाजाला कुणबी संबोधण्याची अधिसूचना निर्गमित होईपर्यंत ५ एक्कर जमिनीची अट शिथिल करून ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळावा. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतिगृह जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर सुरू करण्यात यावे. सारथी संस्थेला पूर्णवेळ अधिकारी वर्गाची नेमणूक करून सदर संस्थेसाठी आर्थिक तरतूद करावी.

बातम्या आणखी आहेत...