आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा; युवासेनेचे प्रदेश सचिव सरदेसाई यांचे आवाहन

तुुळजापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन युवा सेनेचे प्रदेश सचिव वरूण सरदेसाई यांनी केले आहे.

शहरातील लोहीया मंगल कार्यालयात आयोजित युवा सेनेचा मेळाव्यात वरूण सरदेसाई बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख अनिल खोचरे, राज्य विस्तारक शरद कोळी, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नाईक, चांदीवलीचे विभाग प्रमुख बालाजी सांगळे, अंधेरीचे विभागप्रमुख मयूर पांचाळ, जिल्हा युवा अधिकारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, तालुका युवा मोर्चा प्रमुख प्रतीक रोचकरी आदींची उपस्थिती होती. वरूण सरदेसाई म्हणाले, सत्याची बाजू आपली असल्याने कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असून धनुष्यबान हे चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगितले. गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक, अभियान राबवण्याचे आवाहनही सरदेसाई यांनी केले.

मेळाव्याला भर पावसात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. तत्पूर्वी सरदेसाई यांनी तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, श्याम पवार, राजअहमद पठाण, सुधीर कदम, शामल वडणे, कमलाकर चव्हाण, बाळकृष्ण पाटील, सुनील जाधव, प्रदीप मगर, चेतन बंडगर, सुनील कदम, सागर इंगळे, अर्जुन साळुंके आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...