आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:नव्या शैक्षणिक वर्षामध्ये सेतू अभ्यासक्रम; 30 दिवसांचा कार्यक्रम

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांचा शिक्षणातील पाया मजबूत व्हावा, यासाठी नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. गेल्या वर्गात महत्वाच्या क्षमतांवर आधारित ३० दिवसांचा सेतू अभ्यासक्रम प्रत्येक शाळांमध्ये शिकवला जाणार आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१च्या अहवालात भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांत विद्यार्थ्यांचा पाया कच्चा आहे, असे समोर आले असून याचा परिणाम शालेय गुणवत्तेवरती होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्यस्तरावर यंदाच्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा सेतू अभ्यासक्रम विषय निहाय व इयत्तानिहाय तयार करण्यात आला आहे.

गेल्या वर्षातील इयत्तेचे महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित अभ्यासक्रम असणार आहे. सेतू अभ्यासक्रम ३० दिवसांचा असून शालेय कामकाजातच अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

शिक्षक व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम सुरूवात करण्यापूर्वी सूचना दिल्या जाणार आहेत. सेतू अभ्यासक्रम विद्यार्थी विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक दिवशी सोडवतील. या प्रकारे नियोजन केले असून पुर्व चाचणी १७ ते १८ जून दरम्यान होईल. सेतू अभ्यासक्रम २० जून ते २३ जुलै दरम्यान तर उत्तर चाचणी २५ ते २६ जुलै या कालावधीत होणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. अ. भा. मोहरे यांनी मंगळवारी (दि.७) पत्रकाद्वारे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...