आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:काटी येथील सेवा सोसायटी कुलुपबंद; शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र मिळेना, गटसचिव दौऱ्यावर

तामलवाडीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी नेहमीच कुलूपबंद असल्याने येथील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. या सोसायटीचे गटसचिव नेहमीच दौऱ्यावर राहत असल्याचे शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र मिळणे कठीण झाल्याची तक्रार शेतकऱ्यांमधून होत आहे.

ग्रामीण भागात सोसायट्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. पीक कर्जासह खते, बियाणे, शेती अवजारांसाठीही सोसायट्या कर्जपुरवठा करतात. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात सोसायट्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, काटी येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये शेतकऱ्यांची कामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. काटीसह दहिवडी येथील शेतकऱ्यांना याच सोसायटीचा आधार आहे. मात्र, येथे कर्तव्यावर असलेले गटसचिव सोसायटीला कुलूप लावून नेहमीच दौऱ्यावर जात असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. सध्या खरीप हंगाम सुरु असून शेतकरी पीक कर्जासाठी धावाधाव करत आहे. पीक कर्जासाठी बँकेला लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहे. मात्र, काटी येथील सोसायटीमधून बेबाकी प्रमाणपत्र मिळणे मुश्किल झाल्याने असून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आठवड्यापासून चकरा
मला पीक कर्जासाठी सोसायटीच्या बेबाकी प्रमाणपत्राची गरज आहे. मी आठवड्यापासून काटी येथील सोसायटीचे गटसचिव संजय साळुंके यांच्याशी संपर्क साधत आहे. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. चौकशी करुन कारवाई करावी.
- रंजना गायकवाड, खातेदार शेतकरी, दहिवडी.

शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत
सोसायटीचे गटसचिव कामानिमित्त आज बाहेर गेले आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. संबंधीत शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले जाईल.
-विक्रमसिंह देशमुख, चेअरमन, कार्यकारी सोसायटी काटी.