आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींसह सोसायट्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा बाजार समितीच्या मतदान यादीत समावेश करण्याची मागणी आक्षेपाद्वारे करण्यात आली आहे. बाजार समितीची प्रारूप मतदार प्रसिद्ध केली असून त्यावर सात आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. अंतिम मतदारयादी सात डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप मतदारयादी जाहीर होताच राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे.
मागील दीड वर्षांपासून रखडलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली. यावर २३ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप घेण्याची मुदत होती. यात ७ आक्षेप दाखल झाले. यावर सुनावणी होऊन दोन डिसेंबर रोजी निर्णय देण्यात येणार आहे. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडीत सरळ लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकास आघाडीची मोट बांधणार : मगर
बाजार समितीसाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते सुनिल चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, तालुका अध्यक्ष अमर मगर यांचा नेतृत्वाखाली निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन तुल्यबळ पॅनल उभे करणार असल्याचे काँग्रेसचे नेते ऋषीकेश मगर यांनी सांगितले.
पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढणार: गंगणे
ही निवडणूक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेऊन लढवणार आहोत, असे विद्यमान सभापती विजय गंगणे यांनी सांगितले. मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीस सामोर जाऊ असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.