आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:उस्मानाबाद तालुक्यातील मतमोजणीसाठी सात फेऱ्या; 30 टेबलवर होणार मोजणी

तेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ४५ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी करण्यासाठी ३० टेबलची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी मतमोजणीच्या सात फेऱ्यांमध्ये निकाल लावण्यात येणार असल्याची माहिती तालुका निवडणूक अधिकारी गणेश माळी यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.या टप्प्यात उस्मानाबाद तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश होता.

या निवडणुकीची मतमोजणी २० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता महसूल भवन येथे होणार आहे. ३० टेबलवर निवडणूक अधिकारी, मतमोजणी सहाय्यक व शिपाई असे तीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी ९० कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणार आहेत. पहिल्या फेरीत गोपाळवाडी, कोंबडवाडी, वाकरवाडी, कोल्हेगाव, गोरेवाडी, कावळेवाडी, आंबेहोळ, जुनोनी, शेकापूर, देवळाली या छोट्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. दुसऱ्या फेरीत तडवळा, शिंगोली, अंबेजवळगा, कौडगाव, खानापूर, टाकळी बे. तर तिसऱ्या फेरीत रूईभर, किणी, तेर, कोंड करंजखेडा या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. चौथ्या फेरीत वरूडा, उपळा, ढोकी, कनगरा या गावचा निकाल लागणार असून पाचव्या फेरीत कामेगाव, समुद्रवाणी, मेंढा, पाडोळी, महाळंगी ( पंचगव्हाण) धारूर, केशेगाव, सारोळा (बु.) या गावचा समावेश आहे. मतमोजणीच्या सहाव्या फेरीमध्ये पळसवाडी, वाडीबामणी, बामणी, तोरंबा येवती, उतमी कायापुर, सुर्डी, इर्ला, दुधगाव, उमरेगव्हाण या गावचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...