आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वावलंबी:कलदेव निंबाळा येथे महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण ; महिला व युवतींना आत्मनिर्भर करण्याचा निर्धार

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील महिला व युवतींनी विविध कौशल्यात वृद्धी करुन आत्मनिर्भर बनून घरपरंपचा सोबतच व्यवसायातून स्वावलंबी होत इतरांनाही काम देवुन स्वतःसह इतरांचे आधार व्हावे असे मत सरपंच सौ सुनिता पावशेरे यांनी व्यक्त केले.कलदेव निंबाळा ग्रामपंचायत व युवा परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांसाठीच्या शिलाई मशीन प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी पावशेरे बोलत होत्या. या प्रशिक्षणाचा एक ते ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे एक महिन्यांचा कालावधी आहे.

यावेळी युवा संस्थेचे सुहास परडे यांनी प्रास्ताविकात म्हणाले, महिलांच्या सर्वांगीण विकासासोबत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक छोटासा उपक्रम म्हणून शिलाई मशीन प्रशिक्षणातून ग्रामीण भागात महिला-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करत आहे. शिवणकला प्रशिक्षणाद्वारे मुलींना व महिलांना टेलरिंगमध्ये प्रशिक्षित करून रोजगार मिळवून देणे, यामध्येे गरीब, गरजू, निरक्षर महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. पन्नास टक्के फीस ग्रामपंचायत भरणार तर भारत सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. सदर शिलाई कौशल्य वृद्धी प्रशिक्षण प्रशिक्षिका रसिना राॅय यांनी शिलाई बाबतीत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणार्थी रेखा गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणास जयश्री बिराजदार, पल्लवी डोणगावे, स्वाती बिराजदार, सुजाता आलमले, रेणुका जकेकुरे, दिक्षा कुलकर्णी, रूक्सार मुल्ला, प्रियंका पावशेरे, आशा सरवदे, स्नेहल गायकवाड, मोहिनी सरवदे, सावित्री सरवदे, सुप्रिया सरवदे, राधिका सरवदे, अलका क्षीरसागर आदीसह २५ प्रशिक्षणार्थीसह महिला, युवती उपस्थित होत्या. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी ग्रामसेवक सुनिल पांचाळ, अंनिस कार्यकर्ते देविदास पावशेरे, सिद्धेश्वर नंदगावे आदींचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...