आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडीचे पत्र:शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ब्रँडअॅम्बेसेडर शहाजी पाटील

सांगोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी आमदार शहाजी पाटील यांची निवड करण्यात आली. ठाणे येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन निवड करण्यात आली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे, मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत आहे.

बातम्या आणखी आहेत...