आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फैसला:शाकंभरी नवरात्र महोत्सव; यजमान पदाचा फैसला आज होणार

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या यजमान पदाचा फैसला मंदिर संस्थानच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत होणार आहे. कोणत्या पुजारी मंडळाला मिळणार हे यजमान पद मिळेल यावर शिक्कामोर्तब होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच यात सिंहासन महापूजा, सुवासिनी पास, प्रक्षाळ पास, चरण तीर्थ पास आदींवर होईल.तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सवास ३० डिसेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.

सहा जानेवारी २०२३ रोजी शाकंभरी पूर्णिमेला दुपारी पूर्णाहुतीने नवरात्राची सांगता होणार आहे. तत्पूर्वी २३ डिसेंबरला सायंकाळी देवीच्या नवरात्र पूर्वीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाचे यजमान पद निश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीत दुपारी बैठक होणार आहे.

बैठकीला महंत, तिन्ही पुजारी मंडळाचे पदाधिकारी, मंदिर संस्थानचे अधिकारी कर्मचारी उपस्थित असतील. शाकंभरी नवरात्रात सर्व धार्मिक विधी यजमानांच्या हस्ते होतात. त्यामुळे यजमान पदाला विशेष महत्व आहे. तिन्ही पुजारी मंडळांपैकी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला धर्मादाय आयुक्तांच्या निर्णया नुसार होणार आहे. यामुळे याकडे पुजारी वर्गाचे लक्ष लागले. गेल्या वर्षी यजमान पदाचा मान पाळीकर पुजारी मंडळाने भूषवला होता.

बातम्या आणखी आहेत...