आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:तलमोड येथील  शंकर जगदाळे यांचा सीए झाल्याबद्दल सत्कार

उमरगा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तलमोड येथे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील माजी विद्यार्थी शंकर जगदाळे यांनी आयसीएआय परीक्षेत यश प्राप्त करून सी ए झाल्याबद्दल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त सत्कार करण्यात आला.

प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (०१) शंकर जगदाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक विराज मोरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्रापं सदस्य राजेंद्र जाधव उपस्थित होते. सहशिक्षक महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचलन केले. शिक्षक जितेंद्र जाधव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...