आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी ओसरले, बांधावर नेत्यांचा पूर:शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली तरी ते काढावे, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना सूचना

उस्मानाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व परिस्थितीला एकटे राज्य सरकार तोंड देऊ शकणार नाही, केंद्राने मदत करावी : शरद पवार
  • आतिवृष्टीचे हे संकट संपूर्ण शेतीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था उद्धवस्त करणारे आहे

परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. पाणी ओसरताच आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. पवारांनी आज तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादमधील पाटोदा, करजखेडा या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

'राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भागाची पाहणी करून कर्ज घेऊन लोकांना या संकटातून बाहेर काढावे. केंद्र सरकारनेही राज्याला मदत करण्याची गरज आहे असे पवार म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार ?

> या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. एकंदर नुकसानाचे स्वरूप पाहिले तर या सर्व परिस्थितीला एकटे राज्य सरकार तोंड देऊ शकणार नाही. याठिकाणी केंद्राकडून मदत मिळाली पाहिजे. आपण आपल्या लोकप्रतिनिधींना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संबंधित प्रतिनिधींशी बोलू, असे पवार यावेळी म्हणाले.

> 'काल मी पाहणी केली त्यानंतर केंद्राने मदत करावी असे म्हटले होते. पण, लगेच पाहणी करून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. पाहणी करावे लागते, पंचनामे करावे लागता सर्व माहिती रेकॉर्ड ठेवावे लागते. त्यानंतर मदतनिधीची घोषणा होत असते. किल्लारीमध्ये जेव्हा भूकंप आला होता. त्यावेळी सर्व स्तरातील लोकांनी मदत केली होती. भूकंप झाल्यावर लगेच घरांची बांधणी झाली नव्हती, त्यामुळे सर्वांनी मदत करण्याची वेळ आहे', असेही पवार यांनी स्पष्ट केले.

> 'सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अनेक पिके कुजली किंवा सडली आहे. दुष्काळाच्या काळात उसाची लागवड कमी झाली होती. पुढील वर्षी याची कारखाने लवकरच सुरू करावे लागणार आहे. उसाचे प्रचंड नुकसान झाले. ते नुकसान भरून काढता येणार नाही', असंही पवार म्हणाले.

> नदी, ओढा शेजारी विहिरी घेतल्या, अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकल्या आहे. काही ठिकाणी जनावरे वाहून गेली. गाव पातळीवर रस्ते वाहून गेले आहे. पाण्याचा प्रवाह हा बदलला आहे. पाण्यामुळे नदीतील माती वाहून गेली आहे. पिके गेली तर एका हंगामाचे नुकसान होते, पण पाण्यामुळे मातीच खरडून निघाल्याने ते नुकसान जास्त धोकादायक आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असे चित्र आहे, अशी चिंताही पवारांनी व्यक्त केली.

> त्यांच्याकडे कोणती जादू दिसत आहे. आले की लगेच प्रश्न सोडवतील. आमची विनंती आहे की, त्यांनी आम्हालाही थोडी जादू शिकवावी. म्हणजे आम्हालाही त्यांची मदत होईल, असा टोलाही पवारांनी विरोधकांना लगावला आहे.

> पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मदत करण्यासाठी आश्वासन दिले आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही राजकारणी एकमेकांची जी काही मदत घ्यायची ती घेतो. भूजमध्ये भूकंप आला होता. तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. भाजपचे पंतप्रधान होते त्यांनी पक्ष न बघता मदत केली. देवेंद्र फडणवीस इथे येणार असतील तर स्वागतच आहे. आणखी कुणी काही करत असतील तर स्वागत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...