आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी 3 दिवसांपासून कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु आहे. धाराशीवमधल्या शेतकऱ्याने तर शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी चक्क झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत असताना यावरून मोठ्या प्रमाणात टीकेचे राजकारण सुरू आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. दोन दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
विश्वासात घेतले नाही
शरद पवार यांनी जाहिर केलेल्या निर्णयानंतर धाराशीव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकरी बळवंत थिटे यांनी शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्याने दिली आहे.
गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात
बळवंत थिटे हे पवारांचे जुने कार्यकर्ते आहेत. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी या शेतकऱ्याने 1993 ते 2014 या काळात आपली दाढी वाढवून समर्थन केले होते. आता देखील ते थिटे करत सत्याग्रहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. तसेच थिटे यांचे हे झाडावर चढून सुरु असलेले आंदोलन पाहण्यासाठी गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात येत आहेत.
पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन ते प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे. पवार यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्य व देशाला आजच्या कठीण काळात अत्यंत आवश्यक्ता आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.