आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने नागालँडमध्ये एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला. देशाच्या विकासासाठी त्यांनी आता थेट एनडीएमध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. तसेच त्यांनी धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या नामांतराला पाठिंबा व्यक्त केला. दलित पँथर चळवळीतील दिवंगत नेते यशपाल सरवदे यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत सहभागी होण्यासाठी राज्यमंत्री आठवले शुक्रवारी धाराशिव येथे आले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांना उद्देशून आवाहन केले.
या वेळी आरपीआयचे (आ.) प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ आदी उपस्थित होते. राज्यमंत्री आठवले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पूर्ण खिळखिळी झाली आहे. यामुळे आता शरद पवार यांनी काँग्रेसला सोडून एनडीएमध्ये येण्याची गरज आहे. आकडे पाहता आम्हाला शरद पवार यांची गरज नाही. परंतु देशाचा विकास करण्यासाठी पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने आमच्यासोबत यावे, याचा आम्हास फायदाच होणार आहे. पूर्वांचलामध्ये दोन जागा जिंकून रिपाइंने खाते उघडले. महाराष्ट्रात मतदारसंघ मोठे असल्याने अनेक अडचणी आहेत. मात्र, एनडीएसोबतच राहून आम्ही महाराष्ट्रातही यश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान, धाराशिव दौऱ्यावर जात असताना मंत्री रामदास आठवले यांचा बीडमध्ये रिपाइंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ५० फुटांचा हार घालून सत्कार करण्यात आला. आठवले म्हणाले की, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर नावाला आमचा पाठींबा आहे. अनेक दिवसांपासूनची ही मागणी होती. ही मागणी मान्य केल्याबद्दल आनंद वाटतो. जे राजकीय पक्ष याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावे, काय करू नये, हे आम्ही कसे सांगणार. पण दोन्ही शहरांच्या नामांतराला पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
स्मारकासाठी पाच कोटी कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यासाठी पाच कोटी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. स्थानिक प्रशासनाने तसा प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा, असेही आठवले यांनी म्हटले. विराेध करण्यासाठी आंदाेलन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.