आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जवाहर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणासह विविध कार्यक्रमांचा समारोप बुधवारी (दि.१) झाला. शेले पागोटे कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मित्र मैत्रिणींसोबत प्राध्यापक व प्राचार्यांनाही घेरले. कॉलेजमधील दैनंदिन ज्ञानदान, वागणूक, टिंगल टवाळी, उणीवा, वेशभूषा, शरीरयष्टी, वैयक्तिक लकब आदींवर शेले पागोटे टाकत धमाल उडवून दिली. प्राध्यापकांनीही दाद देत फिशपाँडमध्ये गाण्यावर ठेका धरला. प्रा. सलगर व प्रा. राजमाने यांच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी ताल धरला. बुधवारी सकाळी आनंद नगरी व पारंपरिक वेशभूषेनंतर रांगोळी, मेहंदी स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा झाली.
गुणवंत विद्यार्थ्यांना अभिनेते राजीव पाटोदकर व अभिनेत्री विद्या सावळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी पाटोदकर व सावळे यांनी चित्रपट सृष्टीतील अनुभव कथन करून शिक्षणाबरोरच अंगभूत कला जोपासण्याचा सल्ला दिला. यावेळी प्राचार्य उमाकांत चनशेट्टी यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र आलुरे होते तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती खोबरे, व्यंकट पाटील, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी उपप्राचार्य मल्लिनाथ लंगडे, प्रा. उमाकांत सलगर, प्रा. सूर्यकांत आगलावे, प्रा. अनिता मुदकण्णा, प्रा. मल्लिनाथ बिराजदार, प्रा. मीना जाधव, प्रा. राजशेखर नळगे, प्रा. माधुरी गडसिंग, प्रा. अंकुश कदम, प्रा. विवेकानंद वाहुळे, प्रा. सत्येंद्र राऊत, काशीनाथ कर्पे, संतोष चौधरी, दिलीप चव्हाण, महादेव काकडे, बसवंत बागडे, नामदेव काळे, अमित आलुरे, दिलीप चव्हाण, गणेश सर्जे व शुभांगी स्वामी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. मल्लिनाथ बिराजदार तर आभार प्रा. अनिता मुदकण्णा यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.