आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:कार्यालयातील अधिकाऱ्यांकडूनच त्यास आश्रय; दस्त नोंदणी एजंट हटविण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांना निवेदन

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी एजंटामार्फत करण्याचे तत्काळ बंद करण्याची मागणी बहुजन रयत परिषदेच्यावतीने सोमवारी (दि २०) दुय्यम निबंधक अधिकारी यांना निवेदन देवून केली आहे. दुय्यम निबंधक अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत काही अनाधिकृत एजंट नेमून जनतेची नाहक आर्थिक लूट करण्याचे निदर्शनास आलेले आहे. आपल्या छत्रछायेखाली जनतेकडून पैसे जास्त उकळण्यास काही महाभाग आपले आश्रयाखालीच राहून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट दस्त नोंदणी खर्चाव्यतिरीक्त अतिरिक्त रक्कम उकळत आहेत.

कार्यालयातील अधिकाऱ्यांकडूनच त्यास आश्रय मिळत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हा काळाबाजार त्वरित आठ दिवसामध्ये बंद करण्यात यावा, परिसरातील व अधिकार क्षेत्रातील अनाधिकृत शेड त्वरित काढण्यात यावे. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, यास दुय्यम निबंधक कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. निवेदनावर बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.

बातम्या आणखी आहेत...