आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्याला लाभलेल्या इतिहासातील अमूल्य ठेवा असलेल्या माणकेश्वर येथील प्राचीन कालीन हेमाडपंती महादेव मंदिराबाहेरील शिल्पाला भाविकांच्या श्रद्धेत लपलेल्या अंधश्रद्धेमुळे शेंदूर फासून देवपण प्राप्त झाले होते. ज्यामुळे इतिहासातील सुवर्णकला असलेल्या दगडातील शिल्पाचे अस्तिव हरवले होते. मात्र पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांना केलेल्या आवाहनामुळे या देवपण प्राप्त होऊन आपले खरे अस्तित्व गमावलेल्या पत्रलेखिकेच्या शिल्पाने गुरुवारी मोकळा श्वास घेतला.
चालुक्यकालीन सटवाई देवीचे मंदिर असल्याने त्याच्याच नावावर माणकेश्वर असे नाव पडलेल्या भूम तालुक्यातील माणकेश्वर या ठिकाणी हा प्रकार समोर आला. गावात असलेल्या सटवाई देवी ही लहान मुलांचे भविष्य पाटीवर लिहिते, अशी अनादी काळापासून आख्यायिका असल्याने या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक भाविक रोज येतात. याच मंदिराच्या बाह्यअंगावर पुरातन शिल्पकलेतून दगडी शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. भाविकांनी मागील अनेक वर्षांपासून कोरीव शिल्पांवर श्रद्धेपोटी शेंदूर फासण्यास सुरुवात केली होती. गुरुवारी औरंगाबाद येथून पुरातत्व विभागाचे अधिकारी येथे आले. या प्रकारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सर्वांनी मिळून शिल्पावर फासण्यात आलेला तीन ते चार इंचांचा शेंदराचा थर दूर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.