आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:भाजप सरकारच्या नावाने शिमगा‎

धाराशिव‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक‎ वस्तूंच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ‎ आणि शेतीमालाच्या किंमतीची घसरण होत‎ असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब‎ ठाकरे) पक्षाच्या वतीने आमदार तथा‎ जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या‎ नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर‎ महागाईची होळी पेटवली तसेच भाजप‎ सरकारच्या निषेधार्थ बोंब ठोकून शिमगा‎ करण्यात आला. पन्नास खोके.. एकदम‎ ओके...च्या घोषणा देऊन शिवसैनिकांनी‎ परिसर दणाणून सोडला. असा प्रश्न निर्माण झाला आहे.‎

आंदोलनात वंचित बहुजन महिला‎ आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा‎ लोखंडे, निलोझर काझी, वहिदा‎ अत्तार, ‌नंदा जानराव, शीतल‎ चव्हाण, रुक्मिणताई बनसोडे,‎ कमल बनसोडे, जयश्री कोंडेकर,‎ संगीता गायकवाड, मंगल आवाड,‎ लक्ष्मी गायकवाड, संगीता वाघमारे,‎ सिंधू लोंढे, विद्या वाघमारे, मनिषा‎ रणशृंगारे, लोचना भालेराव, सुमन‎ वाघमारे, सुरेखा सुरवसे, रोहिणी‎ बर्वे, जिल्हाध्यक्ष बी. डी. शिंदे,‎ माजी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष‎ वाघमारे, जिल्हा प्रवक्ते अॅड. के.‎ टी. गायकवाड, प्रसिद्धिप्रमुख‎ भाऊसाहेब अणदूरकर, शेखर‎ बनसोडे आदींसह कार्यकर्ते‎ सहभागी झाले. हे आंदोलन तीव्र‎ करण्याचा निर्धार करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...