आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Osmanabad
  • Shinde Group, BJP Condemn Rahul Gandhi's Statement; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ 

प्रतीकात्मक प्रतिमेस मारले जोडे:शिंदे गट, भाजपकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध ; ​​​​​​​प्रतीकात्मक प्रतिमेस मारले जोडे

कळंब8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे नेते खासदार राहुल यांनी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा बाळासाहेबांची शिवसेना व भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागावी. याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेनेचे कळंब तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, शहरप्रमुख गजानन चोंदे, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, सिद्धार्थ वाघमारे, युवासेना शहरप्रमुख कृष्णा हुरगट, बाबा बारकुल उपस्थित होते.

भाजपच्या वतीने कळंब येथील जुन्या नगरपरिषदेजवळील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणा देत प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात ज्येष्ठ नेते नागनाथ घुले, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, शहराध्यक्ष संदिप बावीकर, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी शेंडगे, अनुसूचित जाती मोर्चाचे सतपाल बनसोडे, भाजप नेते अरुण चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, राज्य परिषद सदस्य शिवाजीराव गिड्डे-पाटील, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, माणिक बोंदर, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, नारायण टेकाळे, बाळासाहेब पवार, सुदर्शन कोळपे, विनोद चौधरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...