आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील येणेगाव-सावदरवाडी निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनल गटाचे सरपंच पदाचे उमेदवार व दोन सदस्य विजयी झाले तर ठाकरे गटाचा एक सदस्य तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या बाणगंगा ग्रामविकास पॅनेलचे चार सदस्य विजयी झाले.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने बाजी मारली आहे.भैरवनाथ ग्रामविकास पॅनल व बाणगंगा ग्रामविकास पॅनलमध्ये अटीतटीचा सामना झाला.
या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने प्रथमच खाते उघडले असुन सरपंच पदाच्या उमेदवार प्रियंका नाईकनवरे ३४० मते घेऊन विजयी झाल्या तर ७ पैकी २ जागेवर भैरवनाथ पॅनेलचे सागर गाढवे, दिपाली नाईकनवरे बिनविरोध तर ठाकरे गटाचे श्रीमंत कातुरे १३६ मते घेऊन निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाणगंगा ग्रामविकास पॅनलने चुरशीची लढतीत ७ पैकी ४ जागेवर दिशा मिसाळ १३६ मते, बालाजी नाईकनवरे १६३ मते, सिताबाई सोनवणे १७३ मते, राधाबाई सांगोळे १६५ मते घेऊन विजयी झाले आहेत तर भैरवनाथ पॅनेलचे दोन सदस्य बिनविरोध आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत ७ जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला सरपंच पद व दोन सदस्य, ठाकरे गटाचे एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाणगंगा ग्रामविकास पॅनेलच्या चार सदस्य विजयी झाले.दोन्ही पॅनेलने गुलाल उधळुन आनंदोत्सव साजरा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.