आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बावी येथील विविधकार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिंदे सेनेची सरशी झाली. सोसायटीच्या सर्वच जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय संपादन केला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये असलेले प्रशांत चेडे यांचे समर्थक पंचायत समितीचे माजी सभापती शामराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन सर्वपक्षीय विरोधात निवडणूक लढवण्यात आली होती. यामध्ये १३ पैकी पॅनलचे मुक्तार तांबोळी, जयराम कवडे व वसंत शिंदे हे तीन संचालक बिनविरोध निवडून आले होते. राहिलेल्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. रविवारी (दि.१) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना समर्थक व राष्ट्रवादी गट यांच्या पॅनलचे सुदर्शन शिंदे, नितीन शिंदे, बळीराम शिंदे, बालाजी शिंदे, अच्युत भांगे, अंकुश शिंदे, रामहरी शिंदे, शोभा परमेश्वर शिंदे, शितल राजेंद्र सावंत, उद्धव शिंदे हे उमेदवार दहाही जागांवर निवडून आले आहेत. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते प्रशांत चेडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, वाशी नगरपंचायतीचे विरोधी पक्ष गटनेते नागनाथ नाईकवाडी, पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजी जगताप, विष्णू शिंदे, श्रीमंत शिंदे यांच्यासह समर्थक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.