आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवासेनेचे प्रदेश सरचिटणीस वरुण सरदेसाई यांचे मत:शिंदेंची लबाडी समजली, सर्वसामान्य शिवसेनेसोबतच

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष सोडण्याची वेगवेगळी कारणे सांगत असली तरी सर्वसामान्य जनतेला ते पटलेले नाही, त्यांची लबाडी समजली आहे. सर्वसामान्य जनता ही शिवसेनेसोबत आहे, असे मत युवासेनेचे प्रदेश सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी येथे व्यक्त केले.

युवा सेनेच्या वतीने उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात शनिवारी (दि.१०) सायंकाळी ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील, सुरेश वाले, बसवराज वरनाळे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, सुधाकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, अजित चौधरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

वरुम सरदेसाई म्हणाले की, अनेक आमदार आमिष व ईडीच्या भितीमुळे शिंदेंसोबत गेले. परंतु जिल्ह्यातील आमदार कैलास पाटील व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. मुंबई महानगरपालिकेतील सत्तेसाठी भाजपने मनसेला सोबत घेतले आहे. परंतु मुंबई भाजपच्या ताब्यात गेली तर मराठी माणसांची शान राहणार नाही. शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत झाला. कोरोना संकट यशस्वी हाताळणारे देशातील ते प्रथम मुख्यमंत्री होते. ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहीले असते तर २०२४ साली पंतप्रधानपदासाठी पुढे येईल, या भीतीपोटी भाजपने शिवसेनेचे आमदार फोडल्याची टीका युवा सेनेचे प्रदेश सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केली. दरम्यान, मतदारांना ताठ मानेने सामोरे जाता यावे, यासाठी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, असे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले. यावेळी युवासेनेचे तालुकाप्रमुख अजित चौधरी, लोहारा तालुकाप्रमुख अमोल, उपप्रमुख महेश शिंदे, संघटक सुमित कदम, उपशहरप्रमुख नितीन नागदे, संभाजी ब्रिगेडचे अक्षय नरवडे, प्रदीप जाधव, गोपाळ शिंदे, सचिन जमादार, विजय भोसले, रणजीत सासुरे, आशिष जाधव, स्वप्निल वाले, दत्ता राजपूत, मनोज घोडके, विष्णू शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...